
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.
फुलेवाडी रिंग रोड.कोल्हापूर येथे शिवबाचा मावळा आणि श्री सद्गुरु श्री बाळूमामा तालीम यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी भारत माता की जय घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी शिवबाचा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड.अमोल दादा माने,डॉ.सागर चौगुले, अक्षय चाबूक सर,अशोक माळवी ,संजय माचाले,प्रसाद खोत,शेणवी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
