जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील HDFC बँकेजवळ घडलेल्या रोख रकमेच्या चोरीच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलीसांनी काही तासांत यशस्वी छडा लावून आरोपीस अटक केली असून चोरीतील रोख रक्कम व आरोपीने गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १३/०७/२०२६ रोजी दुपारी ०३.३० ते ०४.१० वाजेच्या दरम्यान फिर्यादी अबरार अली इरफान अली चौधरी वय २६ वर्षे, व्यवसाय – ऑटो पार्ट विक्रेता, रा. लक्ष्मीनगर, मेहरूण, जळगाव) हे कालिका माता मंदिर चौकातील HDFC बँकेजवळ आले होते. त्यांनी त्यांची मोटारसायकल क्र. MH- १९-DF-४९८४ पार्क करून पाणीपुरी खात असताना त्यांच्या डिक्कीमध्ये ठेवलेली १,००,०००/- रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक १६/०७/२०२६ रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १५९/२०२६, भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेणे तसेच गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक / विशाल जयस्वाल यांनी तपासाची सूत्रे स्वतः हाती घेऊन शनिपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास घटनास्थळ व परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज संकलित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ व परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज संकलित करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती संकलित करून संशयित व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रवि जगदीश प्रजापत वय ३६ वर्षे, रा. प्रजापत नगर, मामुराबाद रोड, जळगाव हा असल्याचे निष्पन्न करण्यात आले. त्याचा शोध घेऊन त्यास निसर्ग कॉलनी, असोदा रोड, जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर चोरीची कबुली दिली.

तपासादरम्यान आरोपीकडून चोरी केलेले १,००,०००/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर देखील जप्त करण्यात आली आहे. चोरीतील संपूर्ण रक्कम पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

सदरची उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सो., अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित सो. व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप-निरी/ संतोष खेडकर, पोलीस उप-निरी/अभिषेक कटारे, पोहेका / ३१०६ योगेश जाधव, पोहेका / १३५६ विजय खैरे, पोहेका / १५४६ निलेश दुगो, पोहेका/४०४ पराग दुसाने, पोहेका / ३८७ अमोल वंजारी, पोहेका / २८५ गणेश ढाकणे, पोहेका / ९३६ योगेश साबळे यांनी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण पोहेका / ४८५ मुबारक देशमुख या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू वाहनाच्या डिक्कीत अथवा वाहनात निष्काळजीपणे ठेवू नयेत. अशा प्रकारच्या संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनशी अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांचेकडून करण्यात आले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!