जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात एक इसम गावठी कट्टा अशा घातक हत्यारांसह दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असले बाबतची गोपनिय बातमी सफी विजयसिंग पाटील यांना दि.१५/०७/२०२६ रोजी प्राप्त झाली. सदर गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरक्षक चंद्रकांत धनके, सफी विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ. किरण चौधरी, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, पो.हे.कॉ. गिरीश पाटील, पोना प्रदीप चौधरी, पो.कॉ. विशाल कोळी, पो.कॉ. सुभाष साबळे, पो.कॉ. योगेश घुगे यांचे पथक नेमून सदर पथकास योग्य त्या सुचना देवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले.

वर नमुद गुन्हे शोध पथकान तात्काळ जळगाव शहरातील अयोध्यानगर, जळगाव ते भुसावळ महामार्ग भागात गोपनिय माहिती काढून शोध घेत असतांना महामार्गालगत अयोध्या नगर ते गौरव हॉटेलकडे जाणा-या सर्विस रोडवर एक मोटार सायकलवर ईसम येतांना दिसले असता सदर पथकाने शिताफीने सदर वाहन थांबवुन वाहन चालकास विचारपुस करुन त्यांच्या अंगझडती मध्ये कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदर संशयित ईसमांस पंचासमक्ष नाव गाव विचारता अभिषेक संजय हवलदार, वय २३ वर्षे, धंदा मजुरी, रा. हल्ली मु. ५० नंबर शाळेजवळ अशोक किराणा जवळ रामेश्वर कॉलनी जळगाव, कायमचा पत्ता गल्ली, बुधवार पेठ सोलापुर जि. सोलापुर असे सांगितले. सदर इसमांना ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन सिसिटीएनएस क्रं. ६०६/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, मु.पो. का. क. ३७ (१) (३), चे उल्लघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर इसम यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे,

१) २०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे कट्टा कि.अं.जु.वा.

२) २,०००/- रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुस कि. अं. जु.वा.

३) १,००,०००/- रुपये किमतीचे बजाज चेतक इलेक्ट्रीक मोपेडे वाहन कि. अं. जु.वा.

एकुण १,२२,००००/-

सदर आरोपीतांस अटक करुन मा. न्यायालयात हजर केला असता त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोना प्रदीप चौधरी करत आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्री संदीप गावीत अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग, श्री बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पो.स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!