घनसावंगी महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा तहसील कार्यालयाला ठोकणार कुलूप, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे प्रदीर्घ काळापासून रिक्त असल्याम ळे सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अन्यथा शुक्रवार रोजी घनसावंगी तहसील कार्यालयासमोर कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा घनसावंगी तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

नागरिकांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घनसावंगी महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक, महसूल सहाय्यक यांसह इतर अनेक आवश्यक पदे रिक्त आहेत. या कर्मचारी टंचाईमळे सातबारा, फेरफार, विविध शासकीय दाखले, नोंदी, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य जनतेला वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. कर्मचाऱ्यांअभावी कार्यालयीन काम काजात मोठा विलंब होत असून सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
