जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेले रवी अनासपुरे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष तथा भाजप महाराष्ट्र राज्य सहकार आघाडीचे सह-संयोजक रोहित निकम यांनी मुंबई येथे रवी अनासपुरे यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी त्यांनी नव्या जबाबदारीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करत भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी रोहित निकम यांनी सांगितले की, “रवी अनासपुरे यांचे संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि पक्ष संघटनेसाठीचे समर्पित कार्य निश्चितच महाराष्ट्र भाजपच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयाचे काम अधिक गतिमान होईल, असा विश्वास आहे.”
रवी अनासपुरे यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांना सक्षम नेतृत्व आणि प्रभावी समन्वय लाभेल, अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
रवी अनासपुरे यांना नव्या जबाबदारीबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
