जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.
रावेर पोलीस स्टेशनला दिनांक १२/०७/२०२६ रोजी दाखल खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा रावेर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी २४ तासाच्या आत शोध घेवून आरोपींना जेरबंद केले आहे.

रावेर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३४३ /२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३(१), ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा सदर गुन्ह्यातील फिर्यादी शेख सलमान शेख शब्बीर, वय २७ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. ऐनपुर ता. रावेर ह.मु. उचंदा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव यांचा मोठा मयत भाऊ शेख कुर्बान शेख शब्बीर, वय ३० वर्षे, रा. ऐनपुर ता. रावेर जि.जळगाव याचे खुनाबाबत फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन दिनांक १२/०७/२०२६ रोजी रात्री ०२.४१ वा. सदर गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १) गणेश विजय उर्फ संजय घोरपडे, वय २५ वर्षे, रा. भोर रेल्वे स्टेशन रावेर ता. रावेर जि. जळगाव याचे यातील मयत याची पत्नी हीचे सोबत अनैतिक संबंध होते. माहे एप्रिल २०२६ मध्ये यातील मयताची आई हीचे गर्भपिशविचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे मयताई आई व मयत हा मयताचे मामा कुर्बान शेख यांचे घरी भोर येथे मुक्कामी होते..
त्यावेळी यातील आरोपी क्र. १ हा मयताची पत्नी हीचे घरी ऐनपुर येथे एकटी असल्याचा फायदा घेवुन तिचे घरी रात्रीच्या वेळी एकटा गेला होता. त्यावेळी ऐनपुर गावातील लोकांनी त्याला मारहाण करुन सदर ठिकाणावरुन हाकलुन दिले होते. त्यानंतर ऐनपुर गावातील लोकांनी सदरची गोष्ट यातील मयतास व त्याची आई हीस सांगितली होती. त्यामुळे यातील मयताने व त्याच्या आईने भोर येथे जावुन यातील आरोपी क्र. १ यास याचा जाब विचारला होता. त्यावेळी यातील आरोपी क्र. १ याने उलट मयतास व मयताची आई अशांना शिवीगाळ करुन तो मयतास म्हणाला कि, तुझी पत्नी व माझे एकमेकांवर खुप प्रेम आहे. तु आमच्यामध्ये आला तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्या गोष्टीचा मनात राग धरुन सदर गुन्ह्यातील आरोपी १) गणेश विजय उर्फ संजय घोरपडे, वय २५ वर्षे, रा. भोर रेल्वे स्टेशन रावेर ता. रावेर जि.जळगाव २) मेघराज वसंत सांगळे, वय ३१ वर्षे, रा. भोर रेल्वे स्टेशन रावेर ता. रावेर जि.जळगाव यांनी संगणमत करुन सदर गुन्ह्यातील मयतास दारु पाजुन यातील मयताचा संगणमताने दिनांक ०९/०७/२०२६ रोजी रात्री २०.०० वा. ते दिनांक ११/०७/२०२६ रोजीचे सकाळी १०.१५ वा. दरम्यान नांदुरखेडा शिवारातील विनायक काशिनाथ पाटील शेत गट नं. ९६ मधील शेतात मयताचा गळा दाबुन त्याचा खुन करुन पळुन गेले होते.
सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे १) गणेश विजय उर्फ संजय घोरपडे, वय २५ वर्षे, रा. भोर रेल्वे स्टेशन रावेर ता. रावेर जि.जळगाव याचा स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक जळगाव यांनी व आरोपी क्र. २) मेघराज वसंत सांगळे, वय ३१ वर्षे, रा. भोर रेल्वे स्टेशन रावेर ता. रावेर जि.जळगाव याचा गुन्हे शोध पथक रावेर यांनी तांत्रिक पद्धतीने व गुप्त बातमीदारमार्फत २४ तासांच्या आत शोध घेवुन त्यांना पकडुन त्यांच्याकडे गुन्हा केले बाबत विचारपुस केली असता त्यांनी संगणमताने सदर गुन्हा केले बाबत तोंडी कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात दिनांक १२/०७/२०२६ रोजी रात्री २२.५२ वा. अटक करुन मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपी मजकुर यांची दिनांक १७/०७/२०२६ रोजी पावेतो ०५ दिवस पोलीस कोटडी रिमांड मंजुर केली आहे.
सदरची कौतुकास्पद कामगीरी श्री. श्रीकांत धिवरे सो., पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्री. संदिप गावीत सो., अप्पर पोलिस अधिक्षक जळगाव, श्री. अनिल बडगुजर सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपुर उपविभाग, श्री. संदिप पाटील, पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पो.हे.कॉ. २५७४ नितीन आमोदकर, पो.हे.कॉ. १६९७ विजय चौधरी, पो. कॉ. ६८४ रुबाब तडवी, पो. कॉ. १३४८ सुकेश तडवी, पो.कॉ. २७५२ विशाल पाटील, पो.कॉ. २१६८ प्रमोद पाटील, सर्व नेमणुक रावेर पोलीस स्टेशन ता. रावेर जि. जळगाव, स्थानिक गुन्हे शाखा पथक जळगाव यांचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
