स्वराज्य वार्ता प्रतिनिधी, योगेश पाटील.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळा ते पिंपरी रस्त्याने (शासकीय योजनेतून एम आर जिएस किंवा इतर ) योजनेतून लावण्यात आलेला वृक्ष्यांची दिन दहाडे कतलं करण्यात आलेली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे. नागरिकांनी या वृक्ष तोडी बद्दल तोंडी तक्रार दिली असता, अधिकारी म्हणतात आमच्या कडे लेखी तक्रार नाही, त्यामुळे आम्ही यावर कुठलीच कारवाई करू शकत नाही, अशा पद्धतीने आपली जबाबदारी झटकून अगदी आपल्या या प्रकाराचे गांभीर्यच नसल्याचे दाखवून देत अधिकारी नागरिकांना उलट उत्तर देत आहेत, तरी सर्व संबंधित अधिकारी यांनी या प्रकारावर तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी भावना जनमानसातून व्यक्त होताना दिसून येत आहे.

काही ठिकाणी एक, दोन वृक्ष कापल्यास अधिकारी त्यांचे अधिकार दाखवतात मात्र या ठिकाणी तबल २८ जिवंत झाडांची कतलं करण्यात आली आहे, सदरच्या प्रकरणातील झाडे ही जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक अंतर्गगत असलेल्या रस्त्यावरची असल्यामुळे अशा पद्धतीने बिना परवानगी जिवंत झाडे कापण्याचा अधिकार कुणालाही नसताना २८ जिवंत वृक्ष कत्तल झाली, तरी या कडे संपूर्ण अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम होत आहे की, अधिकारी जाणीवपूर्वक झाडे तोडणाऱ्या पाठीशी घालत आहेत.
एका बाजूला सरकार पर्यावरण वाचविण्यासाठी अनेक योजनांमधून वृक्षारोपण करत आहे आणि अवैध वृक्षतोडी विरुद्ध कठोर कायदे बनवित आहे तरी शासनाचे अधिकारी, कर्मचारी मात्र सरकारी नियमांची सर्रास पायमल्ली करताना दिसून येत आहेत, आता तरी सदर झालेल्या वृक्ष कत्तली बाबत पूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांना मधुन होत आहे. तसेच या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत स्वराज्य वार्ता लाईव्ह पाठपुरावा करत राहणार.
