अहिल्यानगर, (देवळाली प्रवरा), प्रतिनिधी, शंकर कवाने :
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथे भव्य उद्घाटन व प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे, संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरदभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली कामगार शक्ती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी शरदभाऊ परदेशी यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र संघटक समीरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख योगेश सुराणा, अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष शंकर कवाणे, यांच्यासह संघटनेचे संदीप गाडेकर गीताराम बर्डे गोवर्धन जगताप शंकर कवाने. शुभम नालकर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान बांधकामगार कामगार शक्ती संघटणा कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सुरक्षा उपकरण पेटी (सेफ्टी किट) व सुरक्षा संच यांचे वितरण करण्यात आले. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

या भव्य सोहळ्यामुळे संघटनेला नवसंजीवनी मिळाली असून सामाजिक बांधिलकी, कामगारांचे हक्क आणि जनहिताची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

