जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

दिनांक- २२/०६/२०२६ व १०/०२०२६ रोजी जळगांव शहरातील जमुना नगर भागात होणार एक बालविवाह तसेच कांचन नगर जळगांव भागातील बिंदुबाई हॉल येथे होणारा एक बालविवाह शनिपेठ पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे यशस्वीपणे यशस्वीपणे रोखण्यात आला आहे. या धडक कारवाईनंतर पोलीसांनी जमुना नगर भागात व कांचन नगर भागात आणि शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दित बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेला समुळ नष्ट करण्यासाठी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असुन पोलीस स्टेशनच्या हद्दित विशेष मोहिम राबवुन कोठेहि बालविवाह झाल्यास कायदेशीर कडक इशारा दिला आहे.

कोणीही बालविवाह करण्याचा प्रयत्त केल्यास कोणतीही पुर्व सुचना किंवा समुपदेशन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले केली जातील. विवाह करणे साठी मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष असणे बंधनकारक आहे, असे नसल्यास संबधितावर बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत अजामिनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. यामध्ये केवळ माता-पिताच नव्हे तर विवाहाला मुकसंमती देणारे नातेवाईक विवाह लावणारे पुरोहित, काझी, मंडप डेकोरेटर्स, बैंडवाले वाजंत्री आणि फोटोग्राफर या सर्वांना सहआरोपी करून थेट जेलमध्ये पाठवले जाईल. हा गुन्हा सिध्द झाल्यास दोषींना २ वर्षापर्यंत सक्तमजुरी आणि १ लाख रूपये दंड अशी कठोर शिक्षा होईल तसेच संबंधित व्यावसायिकांचे व्यवसाय परवाने कायमचे रद्द केले जातील.

हा केवळ संदेश नसुन भविष्याकालीन कडक कायदेशीर चेतावणी आहे. आमचे पथक अशा गुन्ह्यांवर २४ तास लक्ष ठेवुन आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-यांची गय केली जाणार नाही.

सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे सो मा अपरपोलीस अधिक्षक संदिप गावीत सो, उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन गणापुर सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विशाल जयस्वाल तसेच मपोउनि / प्रिया दातीर, परिपोउनि / संतोष खेडकर, परिपोउनि / अभिषेक बोरसे , पोहेकाँ / योगेश जाधव, पोहेकाँ/विजय खैरे, पोहेकाँ/ अजय निकम, पोहेकाँ / अनिल साळुखे, पोकाँ/ अमोल वंजारी, पोकाँ/ पराग दुसाने पोकाँ/ निलेश घुगे, पोकाँ/नवजित कटारे, पोहेकाँ/ श्रीराम चौधरी, पोकों/संभाजी पाटील, पोकाँ/गणेश ढाकणे अशांनी केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!