जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील.

विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्य उपाध्यक्ष भगवान भाऊ वाघ यांच्या हस्ते या नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

या निवडीनुसार, 🇲🇺 *विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महा राज्य (VVSS) या संघटनेच्या युवा जिल्हाध्यक्ष पदी जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यात कायम अग्रणीय असणारे, मनमिळावू स्वभावाचे, समाजहितासाठी कायम तडफड करणारे, श्री. निलेश खैरनार ह्यांची महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली. श्री नागोराव पांचाळ सर ह्यांनी सर्व निवड जाहीर केल्या.

या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले, तसेच सर्वांना संघटनेची संघटन कार्यप्रणाली कळावी यासाठी राज्य प्रशिक्षण शिबिर आळंदी येथे लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा ही यावेळी करण्यात आली.
संघटनेतील सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी एकमेकाला सहकार्य व आपल्या पदाच्या जबाबदारीने कार्य करावी ही कळकळीची विनंती नवनियुक्त पदाधिकारी यांना करण्यात आली

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!