जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
घनसावंगी : शहरात अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, येथून राज्यमार्गावरील लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. सध्या केवळ अंबड-कुंभार पिंपळगाव मार्गावरील काही बसच या बसस्थानकात येत असल्याने कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेले बसस्थानक अपुऱ्या बससेवेमुळे निष्प्रभठरत आहे.

घनसावंगी तालुक्यातील बससेवा आजही प्रामुख्याने अंबड आगारावर अवलंबून आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणाहून रांजणी, राणी उंचेगाव, तीर्थपुरी, अंतरवाली टेंभीसह अनेक गावांसाठी थेट बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा किंवा दुचाकीचा आधार घ्यावा लागत आहे. घनसावंगी हे तालुक्याचे मुख्यालय असून येथून जालना, परतूर, तीर्थपुरी, शहागड बस सेवा पुरेशी नाही.
घनसावंगी येथे उभारण्यात आलेले नवीन सुसज्ज बसस्थानक.
गेवराई, आष्टी, पाथरी तसेच इतर तालुक्यांना जोडणारे रस्ते चांगल्या स्थितीत आहेत. रांजणी-देवी दहेगाव आणि कुंभार पिंपळगाव-उक्कडगाव रस्त्यांची कामेही प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे या मार्गांवर घनसावंगी
