एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील गोठ्यातून बैल, दोन गायी आणि म्हशीची दोन पारडे अशी एकूण ४३ हजार रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील शेतगट क्रमांक २४ व २५ परिसरातील गोठ्यात बांधून ठेवलेली जनावरे ७ जुलैच्या रात्री ते ८ जुलैच्या सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सकाळी शेतात गेल्यानंतर जनावरे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये एक बैल (सुमारे २० हजार रुपये), दोन गायी (प्रत्येकी ८ हजार रुपये) तसेच म्हशीची दोन पाडे (४ हजार व ३ हजार रुपये) असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. चोरीस गेलेल्या जनावरांचा तसेच संबंधित चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!