जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना एल.सी.बी शाखेची कारवाई

शहरामध्ये जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. तेगबीर सिंह संधू साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.

दिनांक ०६/०७/२०२६ रोजी १७:३० वाजता फिर्यादी नामे सौ अनिता गोपाल अवधुत, वय ६० वर्ष व्यवसाय गृहिनी रा. शिक्षक कॉलनी विठ्ठल मंदीर जवळ नविन मोंढा रोड जालना यांच्या गळ्यातील ०८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन दोन अनोळखी मोटार सायकल स्वारांनी मारवाडी गल्ली येथे जात असताना बळजबरीने हिस्काऊन घेतली. म्हणुन पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुरनं. ५६०/२०२६ कलम ३०४ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयातील अनोळखी मोटार सायकल स्वारांचा शोध घेवुन गुन्हा तात्काळ उघड करणेबाबत मा. पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव साहेब यांनी पथकास सुचना दिल्या होत्या त्यानुषंगाने आरोपीतांचा तपास करून संशयित आरोपीना बेड्या ठोकण्यात आल्या.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!