चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

चोपडा शहरात सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी आज करण्यात आली. शहरातील विविध भागांना भेट देऊन रस्त्यांची स्थिती, साचलेले पाणी, स्वच्छतेची कामे तसेच नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा आढावा घेण्यात आला.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील, उपनगराध्यक्ष पंकज भैय्या बोरोले तसेच नगरसेविका वंदना ताई पाटील यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पाहणीदरम्यान नगरपालिकेचे अधिकारी दिगंबर वाघ आणि सचिन देसले उपस्थित होते. रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत राहाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!