चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने BLA-2, बूथ प्रमुख आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक धनवाडी फाटा येथील लक्ष्मी नारायण लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत बूथ सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि निवडणूक तयारीवर विशेष भर देत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांतजी बाविस्कर, जिल्हा महामंत्री श्री. राकेश शांताराम पाटील, राज्य परिषद सदस्य श्री. गोविंद सैंदाणे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर पाटील व श्री. रवींद्र पाटील, जिल्हा चिटणीस श्री. हनुमंत महाजन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. संध्याताई महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. पंकज पाटील, मंडल अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील, श्री. पिंटू पावरा, भरत सर. नगरसेवक श्री. गजूभाऊ जैस्वाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, बूथ प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येक बूथ हा पक्षाच्या विजयाचा मजबूत पाया असल्याचे सांगत BLA-2 यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. नवीन सदस्य नोंदणी अभियानाला गती देणे, केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविणे, तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम व सक्रिय संघटन उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीदरम्यान संघटन विस्तार, जनसंपर्क अभियान, आगामी निवडणुकांचे नियोजन आणि बूथ व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पक्षाची विचारधारा आणि विकासाभिमुख धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

चोपडा तालुक्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी, BLA-2, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे बैठकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा देणारी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!