जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त, दोन आरोपीतांना जेरबंद करत, ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३,०६,५४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी “नशामुक्त भारत (Nasha Mukta Bharat)” अभियानांतर्गत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गोपनीय माहिती संकलित करून मोठ्या प्रमाणात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांना दिल्या आहेत.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थांविरोधात सातत्याने प्रभावी कारवाया करण्याचे आदेश दिले होते.

दिनांक १० जुलै २०२६ रोजी पहाटे ०२.३५ वाजता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी. एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ एम. डी. ( Mephedrone) या अंमली पदार्थाची तस्करी करीत आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन संशयितांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यापैकी एकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कायदेशीर तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान आरोपींकडून ५६.२९ ग्रॅम पांढऱ्या रंगाची पावडर जप्त करण्यात आली. घटनास्थळी उपस्थित फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी केली असता सदर पदार्थ मेफेड्रोन (Mephedrone – MD) केली असता खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१. २,८१,५४०/- रू किंमतीचे एकूण ५६.२९ ग्रॅम वजनाचा एम.डी. (Mephedrone) अंमली पदार्थ

२. २५,०००/- रू किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल MH-१९-DJ-०१३२

एकुण ३,०६,५४०/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईत आरोपी १) जयेश देविदास तायडे वय २७ वर्षे रा. हरी ओम नगर, मोहन टॉकीजजवळ,जळगाव २) हितेंद्र शिवाजी परदेशी वय ३१ वर्षे रा. कांचन नगर, जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपीतांनी गुन्हयाती फरार आरोपी नामे भैय्या सोनवणे, रा. कांचन नगर, जळगाव यांचेकडुन विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिली असल्याने, फरार असलेल्या आरोपीतांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून शोध सुरु आहे.

यातील आरोपी नामे जयेश देविदास तायडे यांचे विरुध्द पुर्वीचे देखिल गुन्हे दाखल असुन, त्यांची माहिती खालील प्रमाणे-

९. रामानंद पोलीस स्टेशन गुन्हा. रजि. क्र.८७/२०१६ भादवि सह कलम ३०७

२. जिल्हापेठ पोलीस स्टेशन गुन्हा. रजि. क्र. १६८/२०१६ भादविसह कलम ३५३

३. जिल्हापेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ३१/२०१७ भादविसह कलम ३२६

४. जळगांव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. १७३/२०१९ भादविसह कलम ३९२

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२१७/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ ( NDPS) अधिनियम, १९८५ मधील कलम ८ (क), २२ (क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.”

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, श्री. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील सपोनि अनिल वाघ, पोउनि संतोष पवार, पोउनि दिपक जगदाळे, पोउनि जितेंद्र वल्टे, सफी/अतुल वंजारी, सफी/हेमराज भावसार, पोहेकॉ/अकरम शेख, पोहेकॉ / मुरलीधर धनगर, पोहेकॉ / प्रविण भालेराव, पोहेकॉ/महेश महाजन, पोहेकॉ /विजय पाटील, पोहेकॉ/किशोर पाटील, पोहेकॉ / छगन तायडे, पोकों/प्रदीप सपकाळे, पोकॉ/ राहुल रगडे पोकॉ/उदय कापडणे यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

 

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!