जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, जळगांव विभाग, जळगांव यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्रीय मोटार वाहन अधिनियमान्वये, जळगाव शहरात शहर वाहतुक शाखे कडून वाहतूक समस्यावर अंकुश ठेवणे व अल्पवयीन बालक वाहन चालवितांना मिळुन आल्यास त्यांच्यावर प्रभावी तथा पारदर्शक पणे कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर कारवाई मध्ये ०१ अधिकारी ०८. अंमलदार रस्त्यावर उतरुन त्यांनी ४८ अल्पवयीन मो. सा. स्वार मुलं यांचे पालकांवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली असुन त्यांच्यावर एकुण ०२ लाख ४० हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.

सदर अल्पवयीन मुलांचे पालक यांना शहर वाहतुक कार्यालयात बोलावुन आवाहन करण्यात आले की यापुढे लहान मुलांना मो.सा. चालवू न देणे बाबत समक्ष सुचना देण्यात आल्या आहेत.
यापुढे देखील अशीच मोहिम राबविण्यात येणार पोलीसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे अशीच धडक मोहिम सुरु राहणार बेशिस्त अल्पवयीन वाहन चालक मिळून आल्यास वाहन मालकावर प्रचलित कायदया नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व नियम भंग करण्यावर अंकुश बसुन अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा आमचा उद्देश आहे.
