चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील.

चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत तेलीवाडा परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेविका सौ. निशाताई जैन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परिसरात नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

या नव्या जलवाहिनीमुळे तेलीवाडा परिसरातील नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळणार आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रताताई पाटील आणि नगरसेविका सौ. निशाताई जैन यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामे वेगाने मार्गी लावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी भविष्यातही अशाच विकासाभिमुख कामांना गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत या उपक्रमाबद्दल नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील व नगरसेविका सौ. निशाताई जैन अभिनंदन केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!