चोपडा (प्रतिनिधी)

चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ९ च्या शिवसेना नगरसेविका शालिनी रुपचंद पाटील यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचा धडाका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताचे कार्य अबाधित सुरू ठेवून जनतेची सेवा करत आहेत, नगरसेविका शालिनी पाटील यांनी सांगितले की, जनतेची सेवा हिच ईश्वर सेवा आणि माझ्या हातून अशीच सेवा अबाधितपणे माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी घडत राहो, अशीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. पावसाळ्यात स्वच्छतेच्या अभावी नागरिकांना त्रास होतो, नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो, तसेच अनेक साथीचे रोग पसरण्याची भीती असते असे माझ्या प्रभागात घडू नये, यासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेचे कार्य पार पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

पहिल्या दिवशी हमीद नगर परिसरातील कचरा उचलून स्वच्छता केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांनी अरुण नगर भागातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था लक्षात घेऊन स्वतः तिथे उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि कर्तव्यदक्ष कामामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमधून समाधान होत आहे.

हमीद नगरमधील यश मिळाल्यानंतर नगरसेविका शालिनी पाटील यांनी लागलीच अरुण नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. येथील अस्वच्छतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण केले. विशेष म्हणजे, कर्मचारी काम करत असताना नगरसेविका पाटील स्वतः तिथे प्रत्यक्ष उपस्थित होत्या, जेणेकरून कामाचा दर्जा योग्य राहील याची त्यांनी खात्री केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी शौचालय परिसराची संपूर्ण स्वच्छता केली.

नागरिकांकडून कामाचे कौतुक

सलग दुसऱ्या दिवशी नगरसेविकांनी दाखवलेल्या या
तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रभाग ९ मधील रहिवाशांनी सांगितले की, नगरसेविका स्वतः रस्त्यावर उतरून कामावर देखरेख ठेवत असल्याने कामाचा निकाल त्वरित दिसत आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या शालिनी पाटील यांच्या या कामाची दखल सध्या संपूर्ण प्रभागात घेतली जात असून, त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!