जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अशा प्रत्येकी १०० क्षमतेची वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.

या वसतिगृहांच्या कार्यान्वयनासाठी संबंधित तालुक्यांमध्ये सुमारे ९,२०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली, सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त तसेच शाळा, महाविद्यालये आणि शहराच्या मध्यवर्ती भागाजवळील इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक इमारत मालकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

इमारत भाडेतत्त्वावर देण्यास इच्छुक असलेल्या मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयात सादर करावेत. प्रस्ताव सादर करताना शासनाने निर्धारित केलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!