जळगाव : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या PM-YASASVI केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०३६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मॅट्रिकपुर्व व मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित शाळा व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असून, इयत्ता ९ वी व १० वीतील मॅट्रिकपुर्व व मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
पात्र विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल https://scholarships.gov.in (NSP) वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारिख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. तसेच संबंधित शाळा व महाविद्यालयांनी इन्स्टिट्यूट लेव्हल व्हेरिफिकेशन प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
