चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

चोपडा शहराच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून बोरोले क्रमांक ६, शिरपूर रोड ते बोरोले क्रमांक ६ या मार्गावरील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या विकासकामाची आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली.

यावेळी संबंधित ठेकेदार, अभियंते व कर्मचाऱ्यांना रस्त्याचे काम उच्च दर्जाचे, वेळेत आणि निर्धारित तांत्रिक निकषांनुसार पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांना दीर्घकाळ टिकणारा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या रस्त्यामुळे बोरोले क्रमांक ६ परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार असून, वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामाला प्रत्यक्ष गती मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी परिसराच्या विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!