चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटचे अध्यक्ष तथा युवा सहकार नेते रोहित निकम यांचा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची, नेतृत्वाची आणि शेतकरी-कष्टकरी हितासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा मानाचा गौरव प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेला हा सन्मान रोहित निकम यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष, भाजप प्रदेशाध्यक्ष, सहकार मंत्री, उद्योग मंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, कौशल्य विकास मंत्री, पणन मंत्री यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यशस्वी आयोजनाबद्दल रोहित निकम यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

सन्मान स्वीकारल्यानंतर रोहित निकम म्हणाले की, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा आहे. सहकार चळवळीला अधिक बळकट करण्यासाठी माझे प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील.”

सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा राज्यभरातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून, रोहित निकम यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!