जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील पर्यावरण समिती व सीड बँक (बीज बँक) उपक्रमांतर्गत संकलित करण्यात आलेल्या एक लाख बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव यांच्यातर्फे पंढरपूरकडे निघालेल्या आषाढी वारीतील वारकऱ्यांना वाटपासाठी ही बियाणे ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याकडे सप्रेम सुपूर्द करण्यात आली. “एक वारकरी – एक बीज, हरित महाराष्ट्राची वीण” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी ग्रीन फाउंडेशनचे विजय वाणी यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि बीज संकलनाचे महत्त्व याविषयी विशेष मार्गदर्शन केले. प्रत्येक वारकऱ्याने एक तरी बीज रुजवून त्याचे वृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

हा उपक्रम मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी वर्षभर सीड बँकेत जमा केलेल्या विविध वृक्षांच्या बियाण्यांचा या उपक्रमासाठी उपयोग करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी शाळेचा हा अभिनव उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!