चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित दादा निकम यांची बिनविरोध निवड झाल्याने राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे पणन महासंघाला सक्षम, दूरदृष्टी असलेले आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व लाभल्याची भावना व्यक्त होत आहे.

रोहित दादा निकम यांनी विविध क्षेत्रांत केलेले कार्य, संघटन कौशल्य आणि जनसामान्यांशी असलेला घनिष्ठ संपर्क यामुळे त्यांची ही निवड सर्वमान्य ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कृषी उत्पादनांच्या बाजार व्यवस्थेला अधिक गती मिळेल तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी विविध राजकीय, सामाजिक व सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी रोहित दादा निकम यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या माध्यमातून राज्याच्या कृषी आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
रोहित दादा निकम यांना महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
