जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव : शहरातील वृंदावन अपार्टमेंट परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीपसिंग अमरसिंग जाधव (वय ४५, रा. वृंदावन अपार्टमेंट, जळगाव) यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ४२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण गळफास घेतल्याने झाल्याचे निष्पन्न झाले असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ. श्रीकांत बदर करीत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!