जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : जळगाव शहर महानगरपालिका व यूथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “जळगाव क्लायमेट वॉरियर्स” अभियानाच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना प्लास्टिकऐवजी कागदी कव्हर लावण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक डबे, प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक कव्हरचा वापर टाळून स्टीलचे डबे, स्टीलच्या बाटल्या तसेच वर्तमानपत्रांपासून तयार केलेले कागदी कव्हर वापरण्याचे आवाहन केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, असे त्यांनी सांगितले.

विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सर्व पुस्तकांना कागदी कव्हर लावणे बंधनकारक करण्यात आले असून प्लास्टिक कव्हर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यावरण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जुन्या वर्तमानपत्रांचा पुनर्वापर करून पुस्तकांना कव्हर लावण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

विद्यालयात यापुढेही प्लास्टिकमुक्त शाळा अभियानांतर्गत विविध जनजागृती व कृतीशील उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!