जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी उपचार

जळगाव : महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर अत्याधुनिक सिंगल स्टेज बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला लघवीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील डोंगाव येथील ( वय ४२ वर्षीय इसमास मूत्रमार्ग अरूंद होण्याचा त्रास होता. तपासणीनंतर त्यांना युरेथ्रल स्ट्रिक्चर असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सिंगल स्टेज इचऋ युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. बीएमजी युरेथ्रोप्लास्टी ही मूत्रमार्गाच्या अरुंद झालेल्या भागाची पुनर्रचना करण्याची आधुनिक आणि प्रभावी शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत रुग्णाच्या तोंडातील आतील गालाच्या भागातील श्लेष्मल त्वचा घेऊन ती मूत्रमार्गाच्या बाधित भागावर प्रत्यारोपित केली जाते. त्यामुळे मूत्रमार्गाची रुंदी वाढून लघवीचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. या प्रकारची शस्त्रक्रिया मूत्रमार्गाच्या दीर्घकालीन अरूंदतेवर प्रभावी उपाय मानली जाते. वैद्यकीय संशोधनानुसार या शस्त्रक्रियेचा यशस्वीतेचा दर ९५ टक्क्यांहून अधिक असून शस्त्रक्रियेनंतर बहुतेक रुग्णांना लघवी करताना होणारा त्रास लक्षणीयरीत्या कमी होतो. ही शस्त्रक्रिया महादेव हॉस्पिटलच्या अनुभवी युरोलॉजी तज्ज्ञांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. यामध्ये प्रा. डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांनी प्रमुख भूमिका बजावली. शस्त्रक्रियेदरम्यान ॲनेस्थेसिया विभागाकडून डॉ. रघुनाथ बारहाते व टीम, डॉ. साक्षी सांगोळे, डॉ. सुश्रिता इराबाथिनी आणि डॉ. दर्शन सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत शस्त्रक्रिया पद्धती आणि उत्कृष्ट रुग्णसेवा यांच्या बळावर महादेव हॉस्पिटल युरोलॉजी क्षेत्रात दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय व परिचारिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!