जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शाळा पूर्वतयारी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात व्हावे यासाठी शाळेत विविध तयारीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

अभियानांतर्गत शाळा परिसराची स्वच्छता, वर्गखोल्यांची सजावट, शैक्षणिक साहित्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची तपासणी तसेच शाळेच्या विविध विभागांची पाहणी करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ व आकर्षक बनविला.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सुरक्षित, स्वच्छ व आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालय प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच शैक्षणिक वर्षाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे शाळा नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाली असून पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!