जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शाळेचे विविध उपक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख समितीची जबाबदारी करिष्मा चव्हाण मॅडम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या समितीमार्फत शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण व सामाजिक उपक्रमांची माहिती वर्तमानपत्रे, सोशल मीडिया व इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाणार आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे छायाचित्रण, बातमी लेखन, प्रवेश अभियानाची प्रसिद्धी, विद्यार्थ्यांच्या यशाची नोंद व शाळेच्या उपक्रमांचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्यही समितीमार्फत केले जाणार आहे.
करिष्मा चव्हाण मॅडम यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
