विशेष वृत्तांत
पुढील २ दिवस उष्णतेची लाट; तापमान ४६°C पर्यंत जाण्याची शक्यता 🔥
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 🌡️
काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. गुरुवारपासून तापमानात किंचित घट होऊन ४१ ते ४३ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडू शकतात. ⛈️

🚨 *२७ मे २०२६ अलर्ट*
🔴 *रेड अलर्ट जिल्हे*
▪️ वर्धा
▪️ अमरावती
▪️ चंद्रपूर
🟠 *ऑरेंज अलर्ट जिल्हे*
▪️ अकोला
▪️ नागपूर
▪️ गडचिरोली
🚨 *२८ मे २०२६ अलर्ट*
🔴 रेड अलर्ट जिल्हे
▪️ वर्धा
▪️ चंद्रपूर
🟠 ऑरेंज अलर्ट जिल्हे
▪️ गडचिरोली
▪️ नागपूर
🌡️ राज्यातील उच्च तापमान नोंद
▪️ ब्रह्मपुरी – ४६.६°C
▪️ चंद्रपूर – ४६.४°C
▪️ वर्धा – ४६°C
▪️ नागपूर – ४५.५°C
▪️ गोंदिया – ४५.२°C
▪️ अमरावती – ४४.४°C
▪️ अकोला – ४४.१°C
▪️ वाशिम – ४३.४°C
▪️ यवतमाळ – ४३.३°C
▪️ मालेगाव – ४३°C
▪️ परभणी – ४१.९°C
▪️ जळगाव – ४१.८°C
▪️ बुलडाणा – ४१°C
▪️ अहिल्यानगर – ४०°C
🌧️ मान्सूनबाबत मोठे अपडेट
▪️ सध्या मान्सूनचा प्रवास श्रीलंकेत थांबला आहे
▪️ प्रशांत महासागरात ‘अल निनो’ची प्रक्रिया सुरू झाली आहे
▪️ केरळमध्ये मान्सूनचे आगमन ३० मेपर्यंत लांबू शकते
▪️ ३० मेनंतर पुन्हा पूर्वमान्सून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता 🌦️
⚠️ उष्णतेपासून बचावासाठी काळजी घ्या
▪️ दुपारी बाहेर जाणे टाळा
▪️ भरपूर पाणी प्या 💧
▪️ लहान मुले आणि वयोवृद्धांची विशेष काळजी घ्या
▪️ शेतात काम करताना डोक्यावर कापड किंवा टोपी वापरा 👒
