चोपडा प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील
शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी-जास्त व्होल्टेजची समस्या आणि त्याचा पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम या गंभीर विषयांची दखल घेत आज नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी MSEB अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेत सविस्तर आढावा घेतला.

बैठकीत नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत वीज खंडित होण्यामागील नेमकी कारणे जाणून घेण्यात आली. तसेच शहरातील कमी-जास्त व्होल्टेजच्या समस्येवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाबही यावेळी अधोरेखित करण्यात आली. यासाठी नगरपालिका प्रशासन व MSEB विभाग यांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी दिले.

यावेळी उपनगराध्यक्ष मा. श्री पंकज भैया बोरोले, गटनेते पियुष भाऊ चौधरी तसेच पाणीपुरवठा सभापती मा. किशोर भाऊ चौधरी उपस्थित होते.
🚩 “नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला.
