जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
कदीम पोलिसांची धडक कारवाई! जुन्या जालन्यातील वाड्यावर छापा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.

आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी अत्यंत निर्दयतेने डांबून ठेवलेल्या तब्बल २० गोवंशीय जनावरांची कदीम जालना पोलिसांनी सुटका केली आहे. जुन्या जालन्यातील मोरंडी मोहल्ला भागात पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्या पथकाने मध्यरात्री १:३० वाजता धडक छापा टाकला. या कारवाईत ७ गोहे आणि १३ बैल, असा एकूण ६ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
