जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत चंदनझिरा पोलिसांना मोठे यश आले आहे. छत्रपती संभाजीनगर हायवेवरील कीर्ती ट्रान्सपोर्टसमोर पोलिसांनी सापळा रचून एका दारू तस्कराला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून दुचाकीसह तब्बल १ लाख १२ हजार ६०० रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. योगेश रामेश्वर पिसार (वय २१, रा. सरस्वती मंदिर रोड, खरपुडी, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना हायवेवर अवैध दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने २६ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कीर्ती ट्रान्सपोर्टसमोर छापा टाकला. या कारवाईत आरोपी योगेश पिसार हा त्याच्या ताब्यातील विनापरवाना काळ्या रंगाच्या क्टिव्हा दुचाकीवरून (क्रमांक चक-२१-इड-५४४८) चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आला.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात किंगफिशर बिअर, रॉयल स्टॅग, इम्पेरिअल ब्लू, बसुलुट व्होडका आणि देशी दारू भिंगरी अशा विविध नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीची क्टिव्हा दुचाकी आणि ३७ हजार ६०० रुपयांची दारू, असा एकूण १ लाख १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४३/२०२६, कलम ६५ (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल देशमुख करत आहेत. सदरची धडक कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक स्कॉट, देशमाने, सय्यद, पोलीस हेडकॉन्स्टेबल देशमुख, वायकोस आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर खैरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

