जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने प्लास्टिक बंदीची कितीही दवंडी पिटली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘घड ना घड’ अशीच असल्याचे चित्र समोर आले आहे.

जालना – छत्रपती संभाजीनगर रोडवरील चंदनझीरा परिसराच्या समोरील रस्त्याच्या कडेला सध्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा प्रचंड मोठा ढीग साचले ला दिसून येत आहे. जालना मधील हा ढीग म्हणजे नगरपालिकेच्या (महानगरपालिकेच्या) ढिसाळ कारभाराचा आणि निष्क्रीयतेचा उघडानागडा पुरावाच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

बंदी कागदावर, प्लास्टिक रस्त्यावर !

महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदी लागू केल्याचे जाहीर केले आहे. अधूनमधून लहान-सहान दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचे ‘नाटक’ करून प्रशासन आपली पाठ थोपटून घेते. परंतु, जर खरोखरच बंदी आहे, तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या बाजारात येतातच कशा? आणि त्यांचे थेट ढीग रस्त्यांच्या कडेला कसे काय साचतात? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या पडलेला मोठा प्रश्न आहे.

चंदनझीरा परिसरासमोरील हे विदारक दृश्य पाहून प्रशासनाचा प्लास्टिक बंदीचा निर्णय केवळ कागदावर आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.

 

 

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!