जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी, विशेष वृत्तांत.
पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो.

जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यायल, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, तसेच आमदार, खासदार, कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनाने यावं लागत आहे.
ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहन असल्याने नेहमीच सोलापूरला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागतं आहे, शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोल चा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवाना सहन करावा लागत आहे, याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिनांक १६/७/२०२५ रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
