जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
घनसावंगी : तालुक्यातील रांजणी परिसरात गुटखा विकणाऱ्या तरुणाला घनसावंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. रांजणी येथील अफरोज जानीमियाँ बागवान याच्या घराची गुरुवारी (ता. १४) पोलिसांनी झडती घेतली असता गोवा गुटखा ३७५ पाकिटे, जाफरानी जर्दा २०० पाकिटे, हिरा पान मसाला ३६० पाकिटे, हिरा रॉयल तंबाखू ३६० पाकिटे असा एक लाख ८० हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल आढळला.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक जान्हवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक किरण पवार, पोलिस कर्मचारी जाधव, बाबासाहेब डमाळे, नवनाथ राऊत यांनी केली आहे.
