जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव शहरातील विमानतळ संकुलात असलेल्या एका कंपनीत घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे. या कारवाईत, आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपल्या कुटुंबासोबत बाहेर गेले असताना अज्ञात चोरांनी घरात घुसून चोरी केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले. या कारवाईत, पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली. तपासात असे उघड झाले की, ही टोळी मध्य प्रदेशातील विविध भागांशी संबंधित होती आणि पद्धतशीरपणे चोऱ्या करत असे.
कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग : पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस हवालदार प्रमोद लाडवंजारी, पोलीस नाईक किरण चौधरी, पोलीस हवालदार गिरीश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल मोतीलाल बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत सावळे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मराठे, पोलिस हवालदार नितीन ठाकूर, पोलीस हवालदार राहुल भाटे.
पोलिसांनी आरोपीकडून ₹११,५०,५०० किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त केली.
या पोलीस कारवाईमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली असून, चोऱ्या रोखण्यास मदत होईल. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
