एसपी श्रीकांत ढिवरे!तरुणीला ब्लॅकमेलिंग करून लाखोंची खंडणी उकळणाऱ्याला अटक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला दीर्घकाळ ब्लॅकमेल करण्यात आले. इतकेच नव्हे तर, या भीतीचा फायदा घेत तिच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या यश महेंद्र जैन या संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली असून, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!