जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव शहर प्रतिनिधी काही दिवसापासूनमहिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील दुचाकीसह चारचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चक्क जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असलेल्या भंगार दुकाने तपासणी ही मोहीम पोलिसांमार्फत सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

आज दि.५ मे रोजी सायंकाळपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भंगार दुकाने तपासणी करण्यात येत आहे. दुचाकी व चारचाकी चोरीच्या साखळीचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, अनेकदा चोरीचा माल खपवण्यासाठी भंगार दुकाने हा एक महत्त्वाचा दुवा ठरतात. घरफोडी, वाहन चोरी किंवा सार्वजनिक मालमत्तेची शेतीचे अवजारे , मोटर इत्यादी चोरी करणारा गुन्हेगार तो माल लगेच इतरत्र विकू शकत नाही. भंगार दुकानदारांना असा माल सहजपणे आणि कमी किमतीत विकला जातो.भंगार दुकाने अनेकदा चोरीच्या गाड्यांचे सुटे भाग करून विकण्याचे केंद्र बनतात. त्यामुळे ही कारवाई एक महत्वाची मानली जात आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!