धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे.
मौजे बालाजी नगरी बेटावद या ठिकाणी १ मे महाराष्ट्र दिवस तसेच कामगार दिवस व भगवान बुद्ध जयंती निमित्त प्रबुद्ध जयंती उत्सव समिती बेटावद यांच्याकडून भगवान बुद्ध जयंती उत्साहात तसेच बुद्ध गीत व भीम गीत सादर करून अगदी आनंदाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी शिंदखेडा तालुक्याचे भाजपा तालुका अध्यक्ष नानासाहेब मोतीलाल वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळेस शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमान भाऊसाहेब जिजाबराव पाटील, बेटावद नगरीचे सरपंच दादासो मंगलचंद जैन, तसेच बेटावद परिसरातील भाजपाचे उदयोन्मुख नेतृत्व माननीय दादासो महेश पाटील, अजंदे येथील माजी सरपंच नानासो ईश्वर परदेशी, गुरुवर्य हिम्मतराव फुले सर, माजी जि प सदस्य आबासाहेब नथा वारुळे, माजी जि प सदस्य आबासाहेब मंगेश पवार, माजी पंचायत समिती सदस्य बापू सोमा बागुल, ज्येष्ठ विधीतज्ञ भाऊसो वसंतराव पाठक, माजी सरपंच महिरे आबा, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भाऊ माळी, आदरणीय आप्पासो बी एम पाटील सर, पिंटू आप्पा पवार, परेश जैन, बाबासो शुभम महाजन तसेच प्रबुद्ध जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सामाजिक धार्मिक कार्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे महेशदादा युवा मंच उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे नेते विकासरत्न व कणोली जामफळ धरणाचे प्रणेते पालकमंत्री नामदार भाऊसो जयकुमारजी रावल साहेबांची प्रोटोकॉल नुसार बेटावद या ठिकाणी संध्याकाळी साडेसात वाजेची वेळ होती परंतु मंत्री महोदयाच्या ऐन वेळेस काही अपरिहार्य कारणास्तव ते आपल्या बेटावद नगरीत येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी मोबाईल द्वारे तमाम बेटावद पंचक्रोशीच्या नागरिकांना भगवान बुद्ध जयंती तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, या संदेशात मंत्री महोदयांनी आपण सर्व मिळून भगवान बुद्धांच्या विचारांच्या मार्गावर मार्गक्रमण करू हा संदेश दिला, त्याबद्दल समस्त बेटावद पंचक्रोशी जेष्ठ श्रेष्ठ युवा महिला बालगोपाल यांच्याकडून नामदार भाऊंचे कोटी कोटी आभार असेच सहकार्य व आशीर्वाद बेटावद परिसरातील नागरिकांवर राहू देत ही सदिच्छा व्यक्त केली गेली.

या कार्यक्रमासाठी प्रबुद्ध जयंती उत्सव समिती तसेच महेश दादा युवा मंच बेटावद परिसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
