जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीर्थपुरी येथील एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

दिनांक ०१ मे रोजी गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथे सापळा रचला. यावेळी शंकर विक्रम ताटे (वय ३२ वर्ष, व्यवसाय भाजीपाला विक्रेता) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे होती, जप्त करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपीकडे अवैधरित्या शस्त्र असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याला हे पिस्टल पुरवणाऱ्या इसमाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पो.उपनि. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार इरशाद पटेल, संदीप

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!