स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज मराठवाडा प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. छत्रपती संभाजीनगर | विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर झाला. स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूजने घेतलेल्या आढाव्यानुसार, यंदा मराठवाड्याने निकालात मोठी झेप घेतली असून विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये यशाचा गुलाल उधळला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाच्या टक्केवारीत मुलींनी मुलांवर मात करत यशाचे शिखर सर केले आहे.

मराठवाडा विभाग: जिल्हा निहाय निकाल (टक्केवारी)

यंदा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, निकालाची सुवर्ण अक्षरातील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

✨ लातूर : ९५.५०%

✨ छत्रपती संभाजीनगर : ९५.१५%

✨ जालना : ९४.८०%

✨ बीड : ९३.९०%

✨ नांदेड : ९३.१०%

✨ हिंगोली : ९२.५०%

✨ धाराशिव : ९२.३०%

✨ परभणी : ९१.८०%

बातम्यांची ठळक वैशिष्ट्ये

मुलींचे वर्चस्व: विभागात मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ३ ते ५ टक्क्यांनी जास्त आहे.

शाखानिहाय निकाल: विज्ञान शाखेने निकालात बाजी मारली असून, त्यापाठोपाठ वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल लागला आहे.

ग्रामीण भागाची चमक: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.

स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूजशी बोलताना शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले की, “यंदा निकाल वेळेवर लागल्याचे समाधान व्यक्त केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!