जळगाव, शाकीर शेख.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी बनारस–पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस तसेच अयोध्या कॅन्ट–मुंबई (एलटीटी) अमृत भारत एक्सप्रेस या नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यानिमित्ताने दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानक येथे संबंधित गाडीच्या स्वागताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून गाडीचे स्वागत केले.

सदर अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांमुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातून बनारस व अयोध्या येथे जाणाऱ्या भाविकांसाठी थेट प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे.

सदर कार्यक्रमास भुसावळ येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


