जळगाव प्रतिनिधी :- निलेश खैरनार.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित जळगाव नवनिर्वाचित जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री संदीप पाचंगे (मुंबई) व श्री आशिष साबळे (पुणे) यांचा जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे.
या दौऱ्यादरम्यान दिनांक २५ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय धोरणे आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

तसेच, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रावेर लोकसभा मतदारसंघाची बैठक हॉटेल प्रीमियर, जामनेर रोड, भुसावळ येथे पार पडणार आहे. या बैठकीस रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित संपर्क अध्यक्षांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
