जळगाव – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्याज परतावा योजनेतून राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १,६७० कोटी रुपयांचे सहाय्य वितरित करण्यात आले असून, १.७० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

लाभार्थ्यांना त्वरित, अचूक व पारदर्शक माहिती मिळावी यासाठी महामंडळाने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित Smart Bot संकेतस्थळावर २४ तास उपलब्ध असून, योजना, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन देत आहे. तसेच WhatsApp सेवेमुळे अर्जाची स्थिती, मंजुरी व व्याज परताव्याबाबतची माहिती थेट मोबाईलवर मिळत आहे.

याशिवाय, WhatsApp चॅनेलद्वारे विविध उपक्रम, परिपत्रके व शासन निर्णयांची माहितीही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील पनवेल येथे सुमारे १.५ एकर जागेवर अत्याधुनिक बहुउद्देशीय मुख्यालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये प्रशासकीय कार्यालय, प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र, लाभार्थी सहायता केंद्र आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे महामंडळाचे कामकाज अधिक गतिमान व सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!