जळगाव : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला गती देणे व यशस्वी मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाने ही पुरस्कार योजना गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे.

मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात येणार असून, यामध्ये एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम रुपये ११,०००, द्वितीय रुपये ७,००० व तृतीय रुपये ५,००० अशी आहे.

जागतिक मधमाशा दिनाचे औचित्य साधून २० मे २०२६ रोजी पुणे येथे आयोजित जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुकांनी मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावरून नामांकन अर्ज डाउनलोड करावा किंवा संबंधित जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालयातून अर्ज प्राप्त करावा.

सर्व इच्छुकांनी आपले पूर्ण भरलेले नामांकन ४ मे २०२६ पूर्वी जिल्हा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जळगाव दूरध्वनी : ०२५७-२२५४४२८ / ९१६६५३८१०२८ तसेच संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर दूरध्वनी : ०२१६८-२६०२६४ यांच्याशी संपर्क साधावा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!