चोपडा प्रतिनिधी :- यज्ञेश्वर पाटील.

जळगाव जिल्ह्याने विकासाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात सलग चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीचे प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी यामुळे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मिळालेल्या तब्बल ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा १००% निधी यशस्वीपणे खर्च करण्यात प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव येथील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत चोपडा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शहरातील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

जिल्ह्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी व संपूर्ण प्रशासनाचे प्रत्यक्ष भेटून मनःपूर्वक अभिनंदन केले. “निधीचा असा १००% विनियोग सातत्याने होत राहिला, तर चोपडा शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चोपडा शहरात सुरू असलेल्या विकासकामांना या यशामुळे अधिक बळ मिळणार असून, “सुसंस्कृत व प्रगत चोपडा” या संकल्पनेला आता अधिक वेग मिळणार आहे. जिल्ह्याच्या प्रगतीचा हा वेग कायम राहिल्यास भविष्यात जळगाव जिल्हा राज्यात आदर्श ठरणार, यात शंका नाही.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!