प्रतिनिधी

या पवित्र दिनानिमित्त मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील भाविक तसेच इतर भक्तगण तेरे येथे दर्शनासाठी येत असल्याने, कोणतीही गर्दीची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच सर्व कार्यक्रम शांततेत व सुरक्षिततेत पार पडावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

महापोलीस मित्र संघाच्या सुमारे साठ पदाधिकाऱ्यांची टीम बंदोबस्तासाठी कार्यरत असून, महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडत आहेत. येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करणे, रांगेचे नियोजन करणे, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध करून देणे, तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.

यासाठी एसटीमार्गे पदाधिकाऱ्यांना तेरे येथे पाठविण्यात आले असून, स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधून बंदोबस्त अधिक प्रभावी करण्यात आला आहे.

महापोलीस मित्र संघाच्या या सामाजिक बांधिलकीमुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, संघाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!