शहापूर प्रतिनिधी दिपक विशे

*शहापूर फेस्टिवल चे आयोजन*

शहापुरमध्ये मागच्या वर्षीच्या शहापूर फेस्टिवल बालाजी युथ फाऊंडेशन या महोत्सवाला उदंड प्रतिसादानंतर 2025 मध्ये पुन्हा पुन्हा एकदा शहापुरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी युवकांनी एकत्र येत श्री बालाजी युथ फाऊंडेशन च्या माध्यमातून नववर्षात येत्या जानेवारी मध्ये दिनांक १० ते १२ जानेवारीत ठिकाण शिवसागर पेट्रोलपंप, चेरपोली येथील समोरच्या पटांगणावर तीन दिवसीय शहापूर फेस्टिवल २०२५ चे आयोजन केले आहे. शहापूर फेस्टिवल २०२५ मध्ये शहापुरातील जनजीवनावरील खाद्य, कला, क्रिडा संस्कृतीचे दर्शन घ‌डविण्यात येणार असून मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. विविध वस्तूंचे प्रदर्शनही ठेवण्यात येणार आहे. स्थानिक कलाकारांना वाव देण्याच्या उद्देशाने होणाऱ्या महानृत्य स्पर्धेसाठी कलाकारांची रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समाज मंदिर, परांजपे नगर,चेरपोली येथे पूर्वनिवड चाचणी होणार असून त्याची नोंदणी होणार असून त्याची नोंदणी करण्यासाठी चेतन घावट 7875228877, पांडुरंग मोकाशी 7083335222 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तसेच दि. 10 जानेवारी संध्याकाळी हरिपाठ होणार असून त्यानंतर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध राधा पाटील मुंबई उपस्थित राहणार आहेत.

दि.11 जानेवारी रोजी संध्याकाळी जादूगार शो तसेच त्यानंतर महाराष्ट्रचि गौरव गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच शेवटच्या दिवशी सौ शहापूर कर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. याची माहिती सर्व शहापूर तालुक्यातील लहान मोठ्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहापूर बालाजी युथ फाऊंडेशन 2025 च्या कार्यक्रमाचे आनंद घ्यावा.

तसेच या शहापूर बालाजी युथ फाऊंडेशन च्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा

दि. 10 जानेवारी संध्याकाळी हरिपाठ होणार असून त्यानंतर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील मुंबई कर या उपस्थित राहणार आहेत. दि. 11 जानेवारी रोजी संध्याकाळी जादूगार शो तसेच त्यानंतर महाराष्ट्रचि गौरव गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शेवटच्या दिवशी सौ शहापूर कर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. याची माहिती सर्व शहापूर तालुक्यातील लहान मोठ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहापूर बालाजी युथ फाऊंडेशन 2025 च्या कार्यक्रमाचे आनंद घ्यावा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!